मंचरकरांना राजकीय वादातून गोवले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पिंपरी : महिलेवरील गोळीबार प्रकरणात अॅड. सुशील मंचरकर यांना राजकीय वादातून गोवले आहेर. असा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी सोमवारी (ता.18) पत्रकार परिषदेत केला. विरोधी पक्षनेतेच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते. पिंपरी, एच.ए.वसाहतीमध्ये एका महिलेवर 9 जून रोजी अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी ऍड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे. 

त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 
मंचरकर म्हणाल्या, "प्रभागातील राजकीय विरोधकांनी आपले जगणे मुश्‍कील केले आहे. आपण प्रभागातील नागरिकांशी संवाद साधायला गेल्यानंतर विरोधक व त्यांचे साथीदार पाळत ठेवतात. अनेक खुनाच्या खटल्यात आरोपी असलेले कैलास कदम यांनी पोलिसांना हाताशी धरून खोट्या पुराव्याच्या आधारे आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवले. आपल्या दोन मुलींनाही त्यांच्यामार्फत गुंडांकडून त्रास दिला जातो. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. सतत दहशत, धमक्‍या, पाळत ठेवून आपल्याला मानसिक त्रास दिला जातो, असा आरोपही त्यांनी केला.

याबाबत मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग, मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी योग्य तपास करून 'दूध का दूध पाणी का पाणी' करावे. जर पतींना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रकार सुरूच राहिला तर मला आणि माझ्या दोन मुलींना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 
याबाबत कैलास कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "इतरांना खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवायचे, त्यानंतर माझ्या खुनाची सुपारी दिल्याचे मी नव्हे तर पोलिसांनी उघडकीस आणले. मात्र ही सर्व प्रकरणी न्याय प्रविष्ट असल्याने आपण याबाबत काही बोलणार नाही.''

Web Title: Mancharakars by political debate