साठही मंगल कार्यालये झाली ‘बूक’

Marriage
Marriage

पिंपरी - लग्नसराई सुरू झाल्याने शहरातील मंगल कार्यालये हाऊसफुल झाली आहेत, तर भर उन्हातही रिसेप्शनसाठीची लॉन्स सजत आहेत; तर कार्यालये मिळत नसल्यामुळे अनेकांनी शाळा, मोठी मंदिरे तसेच घरासमोरच मंडप लावून लग्नसोहळा उरकून घेण्याचे ठरविले आहे.

शहरात काही वर्षांपूर्वी मंगल कार्यालयांची संख्या मर्यादित होती. शहराची लोकसंख्या वाढली त्यासह मंगल कार्यालयांची संख्याही वाढली. सध्या शहरात सुमारे ६० सुसज्ज मंगल कार्यालये आणि पाच लॉन्स आहेत. एप्रिलपासून सुरू झालेली लग्नसराई जूनपर्यंत चालणार आहे. यंदा लग्नसराईत तिथी दाट असल्याने विवाहसोहळ्यांची संख्याही वाढली असल्याचे ज्योतिबा मंगल कार्यालयाचे प्रकाश काळे यांनी सांगितले. 

धूमधडाक्‍यात लग्न करण्याची अनेकांची हौस असते. त्यामुळे अनेकांनी लग्नाची तारीख निश्‍चित केल्यानंतर दोन ते तीन महिन्यांपूर्वीच मंगल कार्यालये, लॉन बुकिंग केले आहेत. त्यामुळे मंगल कार्यालये हाउसफुल झाली आहेत. मंगल कार्यालयाचे सध्या ४० ते ६० हजार रुपये दर आहेत. कार्यालय मिळाले नाही किंवा त्याचे दर परवडत नसल्याने अनेकांनी जवळच्या शाळा, समाजमंदिरांना पसंती दिल्याचेही चित्र आहे. २६ जूनपर्यंत लग्नाच्या तारखा आहेत. पुरोहितांच्या मते २५ जुलैपासून ५ सप्टेंबरपर्यंत शुक्रलोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नाहीत. यानंतर ऑगस्टमध्ये एकही लग्नतिथी नाही.  

कार्यालयानुसार लग्नाची तारीख 
लग्नसराई असल्याने जूनमध्येही यंदा लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे शहरातील कार्यालये मेमध्येच बुक झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या तारखेला मंगल कार्यालय उपलब्ध आहे, तीच बुक न झालेली तारीख लग्नासाठी काढण्याकडे नागरिकांचा भर आहे. त्यामुळे ज्यांना लगीनघाई आहे, त्यांची अडचण होत असल्याचे अविनाश मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक हर्षद नढे यांनी सांगितले.

विवाहास उपयुक्त दिवस
एप्रिलमध्ये १७, १८, १९, २०, २२, २३, २४, २६, २७, २८; तर मेमध्ये ७, ८, १२, १४, १५, १७, १९, २१, २३, २६, २९, ३०, ३१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com