"अनन्या' नाटकास मंगेशकर पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - युवा नाट्यनिर्माता संदेश भट यांची निर्मिती असलेल्या "अनन्या' या नाटकास यंदाचा स्व. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच या नाटकाच्या एका प्रयोगावेळी ही घोषणा खुद्द पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केली. "उत्कृष्ट नाटक' या निर्मितीसाठीच्या पुरस्काराशिवाय या नाटकास उत्कृष्ट लेखन- दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट अभिनेता या तीन अतिरिक्त विशेष वैयक्तिक पुरस्कारांनीही गौरविले जाणार आहे. 

या नाट्यपुरस्काराची घोषणाही नाट्यपूर्ण म्हणावे अशीच घडली. नाटकाच्या एका प्रयोगास प्रेक्षकांत पं. हृदयनाथ मंगेशकर सपत्नीक उपस्थित होते. नाटक संपताना प्रथेप्रमाणे शेवटी सर्व लेखक- दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी रंगमंचावर एकत्रित आले असताना मंगेशकर रंगमंचावर आले. नाटक पाहून ते अत्यंत भारावलेले होते. आपला भावनावेग आवरत त्यांनी नाटकाची व संबंधितांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि पाठोपाठच हा पुरस्कार जाहीर केला. विशेष म्हणजे स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ आजवर "उत्कृष्ट नाट्यनिर्मिती'साठी असा हा फक्त एकच पुरस्कार दिला जातो; पण या वेळी सोबतच या नाटकाच्या लेखन- दिग्दर्शनासाठी प्रताप फड यांनाही पुरस्कृत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय याच नाटकातील भूमिकांसाठी ऋजुता बागवे यांना "उत्कृष्ट अभिनेत्री', तर प्रमोद पवार यांना "उत्कृष्ट अभिनेता' या पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे. 

पुरस्काराच्या या घोषणेनंतर अभिनेत्री ऋजुता बागवे यांनी भारती मंगेशकर यांच्या पायाशी झुकून नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद म्हणून त्यांनी थेट आपल्या गळ्यातील सोनसाखळीच त्यांच्या गळ्यात घातली, याचीही नाट्यवर्तुळात व सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे.

Web Title: Mangeshkar Award Announced Ananya drama