सोमवारी बच्चेकंपनीसाठी ‘आंबे खा स्पर्धा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

भन्नाट वर्कशॉपची मेजवानी आणि सर्वांसाठी ‘मॅजिक शो’चे आयोजन

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’ने अफलातून ‘वन डे फन डे’ उपक्रम आयोजिला आहे. येत्या सोमवारी (ता. १) होणारा हा महोत्सव बच्चेकंपनी व पालकांना विविध उपक्रमांची आणि खेळांची भन्नाट मेजवानीच देणारा आहे. 

भन्नाट वर्कशॉपची मेजवानी आणि सर्वांसाठी ‘मॅजिक शो’चे आयोजन

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’ने अफलातून ‘वन डे फन डे’ उपक्रम आयोजिला आहे. येत्या सोमवारी (ता. १) होणारा हा महोत्सव बच्चेकंपनी व पालकांना विविध उपक्रमांची आणि खेळांची भन्नाट मेजवानीच देणारा आहे. 

मुलांच्या सुटीच्या नियोजनाचा ताण दूर करणाऱ्या आणि सुटीची धमाल घडविणाऱ्या ‘वन डे फन डे’मधील सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. खेळातून आनंद घेता यावा म्हणून मुलांसाठी खास वर्कशॉप आणि गेमिंग झोनचे आयोजन करण्यात आले आहे. सहा वर्षांवरील सर्वांना यामध्ये सहभाग घेता येणार असून, दुपारी ३ ते सायंकाळी ९.३० या वेळात तीन भागांमध्ये हे उपक्रम राबविले जाणार आहेत. 

आंब्यांच्या या मोसमात आंबाप्रेमींसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत खास ‘आंबे खा’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मुले व त्यांच्या आईंनाही यात सहभागी होता येणार आहे. ‘देसाई बंधू आंबेवाले या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. 

बच्चेकंपनीला व पालकांसाठी जितेंद्र रघुवीर यांच्या मोफत मॅजिक शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा मॅजिक शो १ मे रोजी संध्याकाळी ७ ते ८.३० वाजता होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी ५० रुपये आहे. वर्कशॉपसाठी स्वतंत्र शुल्क आहे, तर मॅजिक शो सर्वांसाठी मोफत आहे. 

‘वन डे फन डे’

कधी- सोमवार, १ मे २०१७  कोठे- कृष्ण सुंदर गार्डन, म्हात्रे पूल परिसर, एरंडवणे 
वेळ : दु.३ ते रात्री ९.३० 
नोंदणीची ठिकाणे : ‘सकाळ’ची ५९५ बुधवार पेठ व शिवाजीनगर येथील कार्यालये, कृष्णसुंदर गार्डन ( स. ११ ते सायं.५) 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३ किंवा ९५५२११८७१०

वर्कशॉप (वेळ दु. ३ ते ५) 
क्‍ले आर्ट : वयोगट : १२ वर्षांपुढील : शुल्क २०० रु. 
टेराकोटा हॅंगिंग शो पिस  वयोगट ६ वर्षांपुढील : शुल्क २०० रु. 
एरोमॉडेलिंग : वयोगट : ९ वर्षांपुढील : शुल्क ४०० रु. 
‘आंबे खा’ स्पर्धा : वेळ ४ ते ६.३०: वयोगट : ५ ते ८ वर्षे : शुल्क ५० रु. 
गेमिंग झोन : व्हर्च्युअल रीॲलिटी गेम्स, यल्लो ट्री गेम्स, टॅटू पेंटिंग, फेस पेंटिंग, हॅंड पेंटिंग

Web Title: mango eating competition