आंबा पिकला, ग्राहक रुसला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - हापूस आंब्याचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात आले; पण ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागणी थंडावल्याने तयार आंब्याचे करायचे काय, असा प्रश्‍न मार्केट यार्ड येथील विक्रेत्यांना पडला आहे. 

पंधरा दिवसांपासून हापूसचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात आले; पण ग्राहकांकडून अपेक्षित मागणी नाही. कोकणातून कच्चा आंबा बाजारात आणला जातो. या ठिकाणी ते पिकविले जातात. बाजारात कच्च्या आंब्यांची आवक चांगली झाली. मागणी फारसी नसल्याने तयार आंब्यांचे प्रमाण वाढले आहे. तापमान जास्त असल्याने आंबा लवकर पिकत आहे. 

कोकण हापूसप्रमाणेच कर्नाटक हापूस आंब्यांची आवक जोरावर आहे. रविवारी कर्नाटकातील टुमकुर जिल्ह्यातून ४० हजार पेट्या आवक झाली. त्याच वेळी कोकणातील हापूस आंब्यांची १२ ते १५ हजार पेट्या आवक झाली. दर वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याला मागणी कमी असल्याचे व्यापारी युवराज काची यांनी नमूद केले. कर्नाटकातील हापूस आंब्याचा हंगाम सध्या जोरावर आहे, तो जूनच्या मध्यावधीपर्यंत चालेल, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.

रत्नागिरी हापूस आकारमानानुसार प्रति डझन भाव
200 ते 450 रु.

Web Title: mango rate decrease