आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

अक्षयतृतीयेनंतरच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि भाव आटोक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबाखरेदीसाठी सर्वसामान्यांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

पुणे - एप्रिलचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही आंब्याची आवक कमीच आहे. त्यामुळे आंबा अद्याप सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर आहे.

अक्षयतृतीयेनंतरच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि भाव आटोक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबाखरेदीसाठी सर्वसामान्यांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मार्केट यार्डात काल (ता. ७) तीन हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक झाली. तयार आणि कच्च्या आंब्याच्या दरात सुमारे पाचशे रुपयांचा फरक आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम पन्नास टक्केच आहे. सध्या आंब्याची आवक साधारण असली, तरी अक्षयतृतीयेनंतर आवक वाढेल आणि आंब्याचे दर आटोक्‍यात येतील, असे व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी सांगितले.

रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याचे दर  (रुपयांत)
हापूस ४ ते ८ डझन     १५०० ते २५००
हापूस ५ ते ७ डझन    २००० ते ३५००

कर्नाटक आंब्याचे दर 
हापूस ४ ते ५ डझन    १२०० ते  १८००
पायरी ४  ते ५ डझन    ८०० ते  १२००
लालबाग (१ किलो)    ३० ते ५०  
बदाम (१ किलो)    ४० ते ६०

Web Title: Mango Rate High in Market