राष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज - मनिंदरजितसिंग बिट्टा

राष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज - मनिंदरजितसिंग बिट्टा

पुणे - ‘‘भारत माता हाच माझा धर्म असून, वंदे मातरम ही माझी जात आहे. मानवतेच्या भावनेतून आपण एकमेकांकडे पहिले पाहिजे. मात्र आज देशात धर्म, जात, पक्ष या माध्यमातून वेगवेगळे गट पडले आहेत. दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वांनी एकत्र यावे,’’ असे मत ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे (एआयएटीएफ) अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी व्यक्त केले.

पद्मा प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘पद्मा संघर्ष पुरस्कार’ दिले जातात. पुरस्कारांचे यंदा आठवे वर्ष आहे. या वर्षी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’, तर आमदार महेश लांडगे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांना वीरमाता ताराबाई साष्टे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, धीरज घाटे, उद्योजक अमित गायकवाड, डॉ. वैशाली जाधव यांना ‘पद्मा संघर्ष विशेष गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी एआयएटीएफ मुंबईचे अध्यक्ष पी. एस. अहुजा, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार राहुल कुल, दत्ता कोहिनकर, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, उद्योजक संतोष धनकवडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com