स्वप्नं हरपली...जगणं मरणासन्न

१) थेरगाव - डेंगी झालेल्या भागात पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करताना. २) वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे टायरची विल्हेवाट न लावल्याने साठलेला ढीग. ३) वहिनीसाहेब कॉलनी येथे पडलेला राडारोडा.
१) थेरगाव - डेंगी झालेल्या भागात पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करताना. २) वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे टायरची विल्हेवाट न लावल्याने साठलेला ढीग. ३) वहिनीसाहेब कॉलनी येथे पडलेला राडारोडा.

पिंपरी - पोटच्या दोन्ही गोळ्यांना आम्ही काही दिवसांत गमावलं. सांगा’..आता आम्ही कसं जगायचं. दोन्ही लेकरांच्या जाण्याने सर्व स्वप्नेच हरपली. आमचं जगणंच आमच्यासाठी मरणासन्न झालं आहे, असा आक्रोश करीत थेरगाव येथील मणियार दाम्पत्याने अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे थेरगावातील पडवळनगर येथे अदनान मणियार (वय ९ महिने) व उजैर मणियार (वय वर्ष ४) या दोन सख्ख्या भावांचा १५ दिवसांच्या अंतराने दुर्दैवी अंत झाला. उपचारासाठी त्यांना आधी थेरगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु अशा पद्धतीने दोन्ही बाळांचा मृत्यू होईल, अशी किंचितही कल्पना मणियार कुटुंबीयांना नव्हती. अदनान व उजैरचे वडील हमीद मणियार यांनी मुलांच्या मृत्यूला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार असल्याचे सांगितले, तर आई रिझवाना यांनी प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आमच्या चिमुकल्यांवर जी वेळ आली ती इतर कोणावरही येऊ नये, अशी कैफियत त्यांनी ‘सकाळ’कडे मांडली. 

वहिनीसाहेब कॉलनी, कैलासनगर, ‘ड’ प्रभाग परिसर, दगडू पाटीलनगर, पडवळनगर, पवार कॉलनी या भागात कित्येक दिवसांपासून औषध फवारणी झालेली नाही. याच परिसरात डेंगीने अतिगंभीर असलेल्यांची संख्या पंधरावर गेली आहे. साई वाघमारे, स्वरा घोगरे या दीड वर्षांच्या चिमुकल्यांनाही डेंगीचे निदान झाले होते. 

महापालिका अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. आमच्या अखत्यारीत हे कामच येत नाही, असे सांगितले जाते. आता मी कोणाचीही वाट न पाहता महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच सर्व राडारोडा टाकणार असल्याचे नगरसेवक कैलास बारणे यांनी सांगितले.

जीव गेल्यानंतर दखल
शनिवारी सकाळपासूनच परिसरात आरोग्य विभागाचे अधिकारी तैनात होते. परिसरात औषध फवारणी सुरू होती, तर दुसरीकडे वाढलेली झुडपे काढण्याचे काम सुरू होते. साठलेल्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावली. फ्रीजच्या पाण्यात साठलेल्या डेंगीच्या अळ्या काढल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com