Vidan Sabha 2019 : मांजरीकरांचा निर्धार, टिळेकरच आमदार : कार्यकर्त्यांच्या घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

VidhanSabha 2019 : मांजरी : पाणी योजना व रेल्वे उड्डाणपूलासह सुमारे दीडशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्याबाबत मांजरीकरांमध्ये सकारात्मकता दृढ झाली आहे. त्यांच्या पदयात्रेला आज उस्फूर्त प्रतिसाद देत येथील कार्यकर्ते व नागरिकांनी "मांजरीकरांचा निर्धार, टिळेकरच आमदार' अशा घोषणा देऊन त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

मांजरी : 'पाणी योजना व रेल्वे उड्डाणपूलासह सुमारे दीडशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्यामुळे महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्याबाबत मांजरीकरांमध्ये सकारात्मकता दृढ झाली आहे. त्यांच्या पदयात्रेला आज उस्फूर्त प्रतिसाद देत येथील कार्यकर्ते व नागरिकांनी "मांजरीकरांचा निर्धार, टिळेकरच आमदार' अशा घोषणा देऊन त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी आज मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील महादेवनगर, घुलेवस्ती, गोपाळपट्टी, बेल्हेकर वस्ती, माळवाडी, गावठाण, मुंढवा रस्ता आदी भागातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी घराघरातून त्यांच्या कामाचे कौतुक करीत स्वागत करण्यात आले.

उमेदवार टिळेकर म्हणाले, "माझ्या मामाचे गाव म्हणून मांजरीकरांनी माझ्यावर विशेष प्रेम केले आहे. गेल्या पाच वर्षात ४२ कोटी रुपयांची पाणी योजना, ५० कोटी रुपयांचा रेल्वे उड्डाणपूल, ९ कोटी रुपयांचा रस्ते विकास, २६ कोटी रुपयांचा मुळा-मुठा नदीवरील पूल यासह इन्फ्राच्या माध्यमातून २४ तास वीज पुरवठा आदी कामे मार्गी लावण्यात मला यश आले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमातून उतराई होण्याचा यापुढेही माझा प्रयत्न असणारच आहे. त्यांनी मला पुन्हा आमदार करण्याच्या केलेल्या निर्धाराने मी भारावलो आहे.'

पदयात्रेदरम्यान, ठिकठिकाणी महिलांनी उमेदवार टिळेकरांना औक्षण करीत चोवीस तारखेला ''आपल्या विजयानंतर खरी भाऊबीज साजरी करू,'' असे सांगत मांजरीतून मताधिक्याचे अश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिकांनीही यावेळी त्यांना आशीर्वाद देत निवडून देण्याचा संकल्प केला.

सरपंच शिवराज घुले पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अमीत घुले, सुमीत घुले, निर्मला म्हस्के, नयना बहिरट, संजय धारवाडकर, सुनिता घुले, सुवर्णा कामठे, सिमा घुले, प्रमोद कोद्रे, समीर घुले, उज्ज्वला टिळेकर, बबन जगताप, बाळासाहेब घुले, प्रतिक घुले, अँड. नाना म्हस्के, सचिन घावटे, गौरव म्हस्के यांच्यासह मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjari Citizen support Yogesh Tilekar in Vidhan Sabha 2019