मांजरी - जर्मनीत झालेल्या स्पर्धेत आयर्नमॅन ठरलेल्यांचा नागरी सत्कार

कृष्णकांत कोबल
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मांजरी - जर्मनी हम्बर्ग येथील जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या पुण्यातील सोळाही स्पर्धकांनी 'फूल आयर्नमॅन' होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यानिमित्ताने मांजरी फार्म येथे या विजेत्या स्पर्धकांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

मांजरी - जर्मनी हम्बर्ग येथील जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या पुण्यातील सोळाही स्पर्धकांनी 'फूल आयर्नमॅन' होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यानिमित्ताने मांजरी फार्म येथे या विजेत्या स्पर्धकांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

जर्मनी येथे नुकतीच वल्ड ट्रीएथलोन कॉर्पोरेशनच्या वतीने (डब्ल्युटीसी) आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन केले होते. पुण्यातील सोळा स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले होते. २५ पासून ६१ वयापर्यंतचे हे सर्वजण त्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल स्पर्धेतील सहभागी दशरथ जाधव, सतीश ननवरे, सुखदेव सोमवंशी, विक्रम अग्रवाल, संपत हरपळे, प्रांशु टोपाल, निखिल पंत यांचा त्यांचे मार्गदर्शक कौस्तभ राडकर तसेच माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

एव्हरेस्ट वीर भगवान चावले, रनहोलिक्स चे डॉ. योगेश सातव, स्वानंद अॅडव्हेंचरचे संजीव शहा, बिर्ला सुपरचे रवी सिंग, अॅड. प्रभाकर शेवाळे, विकास तुपे, सुनील बनकर, संजय हरपळे, काकासाहेब झांबरे, विक्रम शेवाळे, दिगंबर कोद्रे, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. राहुल झांजुर्णे, डॉ. चंद्रकांत हरपळे, रणधीर टकले, आदी यावेळी उपस्थित होते.

सहभागी स्पर्धकांनी यावेळी आपले अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केले.

Web Title: manjari - Civil felicitation for the people who have been nominated in the competition held in Germany