मांजरी रेल्वेगेट राहणार दोन वर्षे बंद

कृष्णकांत कोबल
रविवार, 22 जुलै 2018

गेली अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या मांजरी-वाघोली जिल्हा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची भूगर्भ तपासणी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष कामासाठी येथील रेल्वे फाटक शुक्रवार (ता. 27) पासून पुढील दोन वर्षासाठी बंद राहणार असून येथून होणाऱ्या वाहतूकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

मांजरी - गेली अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या मांजरी-वाघोली जिल्हा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची भूगर्भ तपासणी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष कामासाठी येथील रेल्वे फाटक शुक्रवार (ता. 27) पासून पुढील दोन वर्षासाठी बंद राहणार असून येथून होणाऱ्या वाहतूकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

मुळा-मुठा नदीवर झालेला पूल, रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण यामुळे सोलापूर-नगर महामार्गाला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून गेली काही वर्षात या जिल्हा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. कामगार, विद्यार्थी व सार्वजनिक वाहतुकीसाठीही हा रस्ता चांगला पर्याय ठरला आहे. अवजड वाहनांचे प्रमाणाही या रस्त्यावर मोठे आहे. मात्र, रेल्वेच्या वाढलेल्या वारंवारतेमुळे येथील गेट क्रमांक 3 ए वारंवार बंद होत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे कामगार, विद्यार्थी व दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना नियोजित वेळेत इच्छित ठिकाणी पोहचणे अवघड होत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकणच्या पुलाचे काम मार्गी लागले असून त्याची निविदाही मंजूर झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करण्यासाठी रेल्वेगेट दोन वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे. 

"मांजरी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदा मंजूर झाली असून ठेकेददारास काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रेल्वेगेट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने दोन वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे. येथून सध्या होत असलेल्या वाहतूकीसाठी अवजड वाहने वगळता हलक्या वाहनांसाठी हडपसर साडेसतरानळी केशवनगर मांजरी व सोलापूर महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोरील भापकरमळा मार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील दोन वर्षे या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एन. देशपांडे यांनी केले आहे.

Web Title: manjari railway gate close for two years