पुण्यात रस्ता खोदला; पण निर्मितीचे काम संथपणे!

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे : महादेवनगर ते मांजरी बुद्रुक रेल्वेगेट दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामात ठेकेदाराने आपली मनमानी करून जागोजागी रस्ता खोदून ठेवून वाहतुकीला व नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण करून ठेवला आहे. अगदी संथपणे रस्तानिर्मितीचे काम सुरू आहे.

या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचा कानाडोळा होत आहे, अशा प्रकारचा सूर नागरिकांतून निघत आहे. वारंवार मागणी करूनही येथे वाहतुकीची सुरक्षितता बाळगली जात नाही, याशिवाय कामाची माहिती असणारे फलक लावले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पूनावाला ग्रुपच्या काॅर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलीटी (सीएसआर) च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या रूंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक त्या पर्यायी उपाययोजना राबविल्या नसल्याने या परिसरात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मांजरी बुद्रुक आणि परिसराचा विकास सध्या मोठ्या झपाट्याने होत आहे. त्यापरीने हव्या असणार्‍या सोयीसुविधा या ठिकाणी उपल्बध नाहीत. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने  या मुख्य रस्त्याचे काम सुरू केले आहे. सुरुवातीला ठेकेेदाराने काम प्रगतिपथावर केले, पण त्यानंतर मात्र काम संथगतीने सुरू आहे. 

सध्या जुना कालवा, पीडिसीसी बँक येथे रस्ता खोदून ठेवला आहे. काही महिन्यापासून दुभाजक आणि फुटपाथचे काम  सुरू करून ठेवले असून मध्येच ते बंदही ठेवले जाते. हा रस्ता मुख्य असल्यामुळे या ठिकाणी सतत वर्दळ व रहदारी असते. वाहतुकीला वळण देताना दिशादर्शक लावलेले नाहीत, रात्रीच्या वेळी कामाचा अंदाज येण्याच्या दृष्टीने तसेच दुभाजकाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले नाहीत. त्यामुळे वाहन चालविताना व पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

माहिती फलक अथवा वाहतूक नियंत्रक नसल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी बर्‍याच किरकोळ अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. ठेकेदाराने एका ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसर्‍या ठिकाणी खोदकाम करायला पाहिजे, परंतु ठेकेदाराने तसे न करता रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा रस्त्याच्या कडेला सुरक्षित कडा लावलेला नाही. त्यामुळे शाळेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

या कामाकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेचे लक्ष ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे. तसेच या कामाकडे प्रशासनाचे अधिकारीवर्ग सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी  या बाबीकडे आपले लक्ष केंद्रित करावे, असा सूर येथील नागरिकांतून निघत आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Web Title: Manjri residents facing traffic congestion due to incomplete roads