कालव्यातून पाणी गळतीमुळे रस्त्याला धोका

कृष्णकांत कोबल
शनिवार, 7 एप्रिल 2018

मांजरी- साडेसतरानळी-मांजरी या भागातून जाणाऱ्या जुन्या कालव्यातून अन्सारी फाटा परिसरात पाणी गळती होत आहे. त्यामुळे कालव्याशेजारील भागात पाणी साठून राहू लागले आहे. या पाण्यामुळे वस्तीमधील नागरिकांच्या आरोग्यासह रस्त्यालाही धोका निर्माण झाला आहे.

मांजरी- साडेसतरानळी-मांजरी या भागातून जाणाऱ्या जुन्या कालव्यातून अन्सारी फाटा परिसरात पाणी गळती होत आहे. त्यामुळे कालव्याशेजारील भागात पाणी साठून राहू लागले आहे. या पाण्यामुळे वस्तीमधील नागरिकांच्या आरोग्यासह रस्त्यालाही धोका निर्माण झाला आहे.

येथील कालव्यात मुंढवा जॅकवेलमधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काव्यावरील दाब वाढून दोन्ही बाजूला पाणी पाझरू लागले आहे. या पाण्यामुळे कालव्याचा भराव खचू लागला आहे. अन्सारी फाटा परिसरात रस्त्यावर पाणी पाझरत आहे. रस्त्यात पाणी मुरत असल्याने तो नादुरस्त होऊ लागला आहे. याशिवाय शेजारी राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या जिल्हापरिषद बांधकाम विभागाकडून कालव्यालगतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीमुळे या कामातही अडथळा निर्माण झाला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश घुले व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी अमर तुपे यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप या प्रकाराकडे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

अमर तुपे म्हणाले,"जॅकवेलमधून जुन्या कालव्यात अधीक क्षमतेने पाणी सोडले जात आहे. पाणी उचलण्यासाठी परवानगीपेक्षा दोन अधीक पंप लावले आहेत. त्यामुळे कालव्यावरील भरावावर दाब वाढला आहे. त्यातून आमच्या वस्तीकडे पाणी वाहत आहे. हे पाणी दूषीत असल्याने आरोग्याचा धोकाही वाढला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून काहिही कार्यवाही केली गेली नाही. ''   
पाटबंधारे विभागाचे कर्मचारी एस.बी.जाधव म्हणाले,"घुलेवस्तीजवळील पुलाखाली गवत व पालापाचोळा अडकल्याने पाठीमागे पाण्याचा फुगवटा वाढला होता. त्यामुळे भरावातून पाणीगळती होत होत आहे. मात्र, सध्या माती टाकून गळती थांबविली आहे.''

Web Title: manjri rode danger due to water leakage