मनमाड - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पूल, रस्त्याचे काम रखडल्याने धोका वाढला

कुरकुंभ ( ता. दौंड ) - चौकातील रस्त्याचे व पुलाचे काम संथगतीने चालू असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
कुरकुंभ ( ता. दौंड ) - चौकातील रस्त्याचे व पुलाचे काम संथगतीने चालू असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकातील मनमाड - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण दरम्यानचे पूल, रस्त्याचे काम तातडीने न केल्यास मुसळधार पावसाने ओढयाला पूर आल्यास एखादी दुर्घटना घडण्याची किंवा अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनमाड - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या रूंदीकरणाचे काम चालू आहे. नगर ते दौंड दरम्यानचे रस्त्याचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. तर दौंड ते गुंजखिळा दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यापैकी दौड ते चोरमलेवस्ती काम झाले असून मोरेवस्ती ते कुरकुंभघाट, कुरकुंभ चौकातील काम चालू आहे.

वनविभागाची रोपवाटिका, कुरकुंभघाट, जिरेगाव ते गुंजखिळा काम रखडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचल्याने दुचाकी घसरने अपघात व वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. कुरकुंभ चौकातील रस्त्याचे व पुलाचे काम संथगतीने चालू असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असून त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मुसळधार पाऊस होऊन ओढयाला पूर आल्यास पाण्यामुळे पुलाचे अर्धवट काम लक्षात न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परिसरात पावसाचे पाणी साचून दुचाकी घसरून किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे कुरकुंभ चौकातील पुलाचे व रस्त्याचे काम त्वरित पुर्ण करण्याचे मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कुरकुंभ येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची लेखी मागणी वारंवार करूनही दखल घेतली जात नाही. रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थ, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दररोज किरकोळ अपघात होत असल्याचे सरपंच राहुल भोसले यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com