पुणे विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी भरले तब्बल इतके अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

‘कोरोना’मुळे पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांनी घटणार असल्याची चर्चा सुरू असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी २१ हजार पेक्षा जास्त जणांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, अशा स्थितीत विद्यापीठात प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये विज्ञान- तंत्रज्ञान व मानव्यविज्ञान शाखेसाठी अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत.

पुणे - ‘कोरोना’मुळे पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांनी घटणार असल्याची चर्चा सुरू असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी २१ हजार पेक्षा जास्त जणांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, अशा स्थितीत विद्यापीठात प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये विज्ञान- तंत्रज्ञान व मानव्यविज्ञान शाखेसाठी अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’मुळे अद्याप २०१९-२० च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देशभरात कुठेही झालेल्या नाहीत. आता सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत, पण राज्य सरकार व विद्यार्थ्यांचा यास विरोध असल्याने वाद पेटला आहे. यातूनच तोडगा काय निघेल अद्याप स्पष्ट न झाल्याने पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Image may contain: sky and outdoor

पुणेकरांनो, लाॅकडाउनच्या काळात मार्केट यार्ड आणि उपबाजार सुरु की बंद राहणार ? वाचा सविस्तर

दरम्यान, पुणे विद्यापीठाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी १ जून पासून प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी सुरूवात केली आहे. त्याची मुदत ३० जून पर्यंत होती. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नसल्याने आता पुन्हा २० जुलै पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

'सारथी' संस्थेबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका; काय म्हणाले पाहा!

पुणे विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि विज्ञान-तंत्रज्ञान  या चार विद्याशाखांमध्ये ८१ पदव्युत्तर पदवी, १५ पदवी आणि ६६ प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रम चालवले जात आहेत. यामध्ये सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

देशभरातून येतात अर्ज
पुणे विद्यापीठात केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यंदा विद्यार्थी पुण्यात येण्यासाठी इच्छुक नसतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, देशाच्या विविध भागातून चौकशी करण्यासाठी विद्यार्थी ईमेल व फोन करत आहेत, असे उप कुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले. प्रवेश परीक्षा अर्जासाठी लिंक : https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx

पुणे विद्यापीठात ५२ विभागात ९६ पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. त्यातील काही अभ्यासक्रम वगळता इतर सर्वांच्या प्रवेश परीक्षा पुणे विद्यापीठाच्या स्तरावर होतात. यंदाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे, २० जुलै पर्यंत मागच्या वर्षा एवढेच अर्ज दाखल होतील.
- उत्तम चव्हाण, उप कुलसचिव

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many applications filled for admission in Pune University