भविष्यात अवकाश क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - ‘‘अवकाश संशोधनातील स्पर्धेमुळे भविष्यकाळात या क्षेत्रामध्ये अनेक संधी निर्माण होतील,’’ असे मत इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘क्रेझी अबाऊट सायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी’ या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमध्ये (आयसर) आयोजित या व्याख्यानमालेच्या उद्‌घाटनप्रसंगी ‘भविष्यातील अवकाश’ या विषयावर डॉ. काळे बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘उपग्रह दुरुस्ती, त्यात इंधन भरण्यासह लेझरच्या मदतीने अवकाश कचऱ्याची साफसफाई, स्पेस कॅप्सूलची रचना, अवकाशयान दुसऱ्या ग्रहावर उतरताना इंधनासाठी सोलर सेलचा वापर या गोष्टींना महत्त्व प्राप्त होणार आहे. अवकाश पर्यटनातदेखील संधी निर्माण होणार आहेत.’’

पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्वस्त रवी पंडित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, ‘पीआयसी’च्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.

अवकाश विमा, अवकाश क्षेत्राशी संबंधित कायदे, पाण्याच्या अस्तित्वाचे संशोधन या बाबी महत्त्वाच्या ठरू शकतील. तरुणांनी याकडे उत्तम करिअर म्हणून पाहणे आवश्‍यक आहे.
- डॉ. प्रमोद काळे, माजी संचालक, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, इस्रो

Web Title: Many career opportunities in future space sector pramod kale