पुण्यात गेल्या १० दिवसांत कोरोनामुळे झाले तब्बल एवढे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या १२५ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत वयाची साठी ओलांडलेले आणि इतर आजारांचे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण, आता वयाच्या तिशी-चाळिशीच्या रुग्णांचे प्राण कोरोना घेत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

पुणे - शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या १२५ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत वयाची साठी ओलांडलेले आणि इतर आजारांचे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण, आता वयाच्या तिशी-चाळिशीच्या रुग्णांचे प्राण कोरोना घेत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू ३० मार्चला झाला. त्यानंतर ९२ दिवसांमध्ये ६१३ रुग्ण कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेत झाली. पण, यापैकी १२५ (२० टक्के) मृत्यू हे गेल्या दहा दिवसांमधील असल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

No photo description available.

रिंगरोडचा पहिला टप्पा बीओटी तत्त्वावर; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय

पुण्यात मृत्युदर ३.८३ टक्के
प्रत्येक शंभर कोरोनाबाधितांपैकी चार रुग्णांचा पुण्यात मृत्यू होत आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत मृत्यू होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचे वय हा उपचारातील मोठा अडथळा असल्याचे दिसत होते. कारण, बहुतांश रुग्ण हे वयाची साठी ओलांडलेले असायचे. वयापाठोपाठ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांमुळे उपचारातील गुंतागुंत वाढायची. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये वय आणि इतर आजाराच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. पण, गेल्या काही दिवसांपासून वयाच्या तिशी-चाळिशीतील रुग्णांचे मृत्यू महापालिकेत नोंदले गेले. त्यापैकी बहुतांश जणांना इतर कोणतेही आजार नव्हते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला, अशी नोंदही झाली आहे.

बारामती :..तर ग्रामीण भागातील हॉटेल, ढाब्यांना कुलूपे लावावी लागणार

रोज सरासरी ४६६ रुग्णांचे निदान
पुण्यात गेल्या दहा दिवसांमध्ये पाच हजार २७७ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे. त्यामुळे दररोज सरासरी ५२७ रुग्णांना कोरोना झाल्याचे शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून निदान झाल्याचे स्पष्ट होते.

रुग्णवाढीची कारणे
अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पुणेकरांची रस्त्यावर गर्दी
महापालिकेची कोरोना निदानाच्या चाचण्यांमध्ये वाढ
संसर्गाची तीव्रता जास्त असल्याने दाट लोकवस्तीत रुग्णसंख्येत वाढ

इतर आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. सुमारे १५ टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. त्यांचा मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाला.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

पिंपरी-चिंचवडमध्ये सतरा जण दगावले
पिंपरी - शहरात जूनमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग व मृत्युदरही सर्वाधिक राहिला आहे. शनिवारी (ता. २२) सकाळी एक हजार ७७६ असलेली रुग्णसंख्या सोमवारी (ता. २९) दुपारी चारपर्यंत दोन हजार ९०९ झाली. म्हणजेच, दहा दिवसांत एक हजार १३३ रुग्ण वाढले, तर २० जूनपर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या ४५ झाली आहे. म्हणजेच, दहा दिवसांत १७ जणांचा मृत्यू झाला. 

सोमवारी रुग्णसंख्या दोन हजार ९०९ झाली. यात आज आढळलेल्या १८७ जणांचाही समावेश आहे. एक जून ते २९ जून (दुपारी चारपर्यंत) या २९ दिवसांत २३४३ रुग्ण वाढले. त्यापैकी ३७ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी ८१ जणांना डिस्चार्ज दिला, तर दोन जणांचा मृत्यू झाला.

कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यावर भर दिला आहे. जूनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल व्हावे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 

दहा दिवसांमध्ये ८५ टक्के रुग्ण वाढले
शहरात सध्या सहा हजार १९५ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी ८५ टक्के (५,२७७) कोरोनाबाधितांचे निदान गेल्या दहा दिवसांमध्ये झाल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many deaths due to corona in Pune in last 10 days