Vidhan Sabha 2019 : मतदानावेळी दिव्यांगांना अनेक अडचणी - गाडे

Vidhan Sabha 2019 : मतदानावेळी दिव्यांगांना अनेक अडचणी - गाडे

विधानसभा 2019 
पुणे -  ‘‘विधानसभा निवडणुकीवेळी दिव्यांग व्यक्तींना मतदान करताना असंख्य अडचणी आल्या, तरीही आम्ही मतदान केले. दिव्यांगांनी पुन्हा मतदान करावे, असे प्रशासनास वाटत असेल, तर त्यांनी त्यादृष्टीने बदल करायला हवेत.’’ ८० टक्के अपंग असणाऱ्या स्मिता गाडे या पोटतिडकीने सांगत होत्या. 

स्मिता गाडे (वय ३२) या महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे राहतात. त्यांच्या कुटुंबासह त्या महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आल्या होत्या. तळमजल्यावरील मतदान केंद्र आल्यामुळे त्यांना मतदान करण्यासाठी अडचण आली नाही. मात्र, सगळ्याच ठिकाणी पुरेशा सोयी नाहीत, त्यामुळे अन्य अपंग बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याद्दल गाडे यांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com