डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक; पुण्यात आणणार

Anand Teltumbde
Anand Teltumbde

पुणे : माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील डॉ. आनंद तेलतुंबडे (वय 68) यांचा गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे दिसून येत आहे, हा निष्कर्ष काढत न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांकडून मुंबई विमानतळावर आज (शनिवार) पहाटे अटक करण्यात आली. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आला आहे.

शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. डॉ. तेलतुंबडे यांनी ऍड. रोहन नहार आणि ऍड. पार्थ शहा यांच्यामार्फत येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनात आपला सहभाग नाही. विरोधात कोणताही ठोस पुरावा नसून, एफआयआरमध्येही नावाचा उल्लेख नाही. तरीही या प्रकरणात गोवले आहे. गोवा येथील घरात विनावॉरंट शोध घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. या अर्जास प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी विरोध केला होता.

यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात पुरेसा पुरावा आहे. सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या ई-मेल संभाषणातून ते देश विरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे लक्षात येत असल्याचा युक्तिवाद करत ऍड. पवार यांनी जामीन फेटाळण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने डॉ. तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून आज पहाटे साडेतीन वाजता त्यांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com