पुणे पोलिसांचा माओवाद्यांच्या "थिंक टॅंक'ला सुरुंग, देशभरातील कारवाईत पाच जण अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबरला एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या समर्थकांचा सहभाग असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी यापूर्वी विविध राज्यातुन 5 जणांना अटक केली होती. एल्गार परिषदेला माओवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थपुरवठा करण्याबरोबरच परिषद आयोजन करण्यामागचा मेंदु हा प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या नेत्याचाच असल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. या पाश्वभुमीवर या पाच जणांच्या केलेल्या चौकशीमध्ये अन्य काही जणांची नावे पुढे आली होती. तसेच पोलिसांनी 5 जणांच्या 200-250 ई-मेल तपासले तेव्हाही संबंधित लोकांचीच नावे पुढे आली.
 
 पुणे : प्रतिबंध घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या पाच शहरांमध्ये सहा जणांच्या घरावर एकाचवेळी छापे घातले. त्यामध्ये नामवंत कवी वरवरा राव यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर एकाची चौकशी सुरू आहे. दरम्यान माओवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या "थिंक टॅंक'वरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. 

पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबरला एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या समर्थकांचा सहभाग असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी यापूर्वी विविध राज्यातुन 5 जणांना अटक केली होती. एल्गार परिषदेला माओवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थपुरवठा करण्याबरोबरच परिषद आयोजन करण्यामागचा मेंदु हा प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या नेत्याचाच असल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. या पाश्वभुमीवर या पाच जणांच्या केलेल्या चौकशीमध्ये अन्य काही जणांची नावे पुढे आली होती. तसेच पोलिसांनी 5 जणांच्या 200-250 ई-मेल तपासले तेव्हाही संबंधित लोकांचीच नावे पुढे आली.

एल्गार परिषदेचा तपास स्वारगेट विभागाचे पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे एकाचवेळी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची या शहरांमध्ये छापे घातले. त्यामध्ये राव, गोन्साल्वीस, परेरा, भारद्वाज व नवलाखा यांना अटक करण्यात आली. तर रांची येथे स्टॅन स्वामी यांची चौकशी करण्यात येत आहे

त्याचबरोबर, पोलिसांच्या पथकाने आज साखळी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच लेखक आनंद तेलतुंबडे यांच्या साखळी येथील निवासस्थानी छापा टाकला मात्र ते घरी सापडले नाहीत. या महाविद्यालयाच्या कॅंपसमध्येच प्राध्यापकांना निवासाची सोय असलेल्या ठिकाणी ही कारवाई आज पहाटेच्यावेळी या पथकाने केली. प्रा. आनंद तेलतुंबडे हे या महाविद्यालयात डाटा ऍनॅलिटिक्‍स हा अभ्यासक्रम शिकवतात. पुणे पोलिसांनी निवासस्थानी धडक दिली तेव्हा ते घरात नव्हते. सध्या ते मुंबईला गेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली.

भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासकामात काहीजणांची नावे पुढे आली आहेत त्यामध्ये आनंद तेलतुंबडे यांचेही नाव आहे. गोव्यातील छाप्यासह मुंबईत तसेच रांची येथे पुणे पोलिसांनी छापे टाकून इतर काही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी साखळी येथील तेलतुंबडे यांच्या निवासस्थानी केलेल्या झडतीवेळी काही दस्तऐवज, सिडी, संगणक, लॅपटॉप तसेच काही पुस्तके ताब्यात घेतल्याचे सूत्राने सांगितले.

तसेच, हैद्रबाद येथील वारवरा राव, क्रांती, मुंबईतील वेरनोन गोंसालवीस, अरुण परेरा, छत्तीसगढ येथील सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा याच्या घरी छापे घालण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Maoist 'Think Tank' and action taken in the country ; Five Maoist arrested in Pune,