मराठा आंदोलकांचा चाकण हिंसाचाराशी संबंध नाही : आर. के. पद्‌मनाभन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी : ''चाकणमधील मराठा आंदोलन दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.'',अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पद्‌मनाभन म्हणाले, "चाकणमध्ये 30 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन झाले. हे आंदोलन दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान संपले. त्यानंतर काही समाजकंटकांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसक घटना केल्या होत्या. तोडफोड करणाऱ्यांचे छायाचित्रे आणि चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली असून, त्यानुसार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यामुळे त्यांची पळापळ झाली आहे. मात्र, आता ते मराठा आंदोलकांच्या नावाखाली आश्रय घेत आहेत.

मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली. त्यावेळी त्यांना वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्यांची छायाचित्रे दाखविली. हे तुमचे आंदोलक आहेत का? या बाबत त्यांना विचारले असता यापैकी एकही आमचा कार्यकर्ता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.'' 
 
Web Title: Maratha agitators are not concerned with Chakan violence: CP Padmanabhan