#MarathaKrantiMorcha एसटीला आंदोलनाची झळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी चाकणमध्ये हिंसक वळण लागले. यामध्ये आंदोलकांनी एसटी बससह अन्य वाहनांची जाळपोळ, तोडफोड केली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बसस्थानकांतील सेवा मंगळवारी पहाटेपर्यंत बंद ठेवली असल्याचे सांगण्यात आले. परिणामी एसटी प्रवाशांचे मोठे हाल झाले. 

आंदोलन हिंसक झाल्यामुळे एसटीचे नुकसान होऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील तीन बस स्थानकांमधील वाहतूक बंद ठेवली. यामुळे मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, सांगली व दादरकडे जाणाऱ्या बस स्थानकांमध्ये उभ्या करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच बाहेरून येणाऱ्या बसदेखील परत सोडल्या नाहीत. परिणामी स्थानकामध्ये बसची मोठी गर्दी झाली होती. तसेच अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी बस न मिळाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. यामुळे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. शिवाजीनगर स्थानकाबाहेर बसची लांबच लांब रांग लागल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. बस सेवा दिवसभर बंद असल्याने एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शिवाजीनगर बस स्थानक 
रात्रीपर्यंत बससेवा बंद
औरंगाबाद, नगर, नाशिक, दादर मार्ग बंद
साधारण १५० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द
पुणे स्टेशन बस स्थानक
सर्व मार्गावरील वाहतूक बंद.
मिरज, फलटण आणि महाबळेश्‍वर मार्गही बंद
२८ फेऱ्या रद्द 

Web Title: Maratha Kranti Morcha affected st bus