आळेफाटा परिसरात कडकडीत बंद

अर्जुन शिंदे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पिंपळवंडी/आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता.1) सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित जुन्नर तालुका बंद आंदोलनात सहभागी होत सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

पिंपळवंडी/आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता.1) सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित जुन्नर तालुका बंद आंदोलनात सहभागी होत सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने होत असताना, आज (ता. 1) सकल मराठा समाजाच्या वतीने जुन्नर तालुका बंद ठेवण्यात आला होता. आळेफाटा येथील सर्व व्यापारी, हॉटेल चालक, छोटमोठे दुकानदार आदींनी सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पळाला. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास परिसरातील आणे, बेल्हे, राजुरी, वडगाव आनंद व आजूबाजूच्या गावांतील सर्वपक्षीय आंदोलकांनी आळेफाटा चौकात एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर मराठा आरक्षणासाठी जीव गमावलेल्या समाजबांधवांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व आंदोलक शांततापूर्ण वातावरणात दुचाकी रॅली काढून जुन्नर येथे होणाऱ्या आंदोलनासाठी रवाना झाले.
यावेळी आळेफाटा बस स्थानकातही शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

Web Title: Maratha Kranti morcha agitation in aalephata