Maratha Kranti Morcha: पुणे विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत चक्री आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तालयामोर बेमुदत चक्री आंदोलन करण्यात येणार आहे.

विविध 15 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समनव्यक राजेंद्र कोंढरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या हिंसाचारात अटक केलेल्या तरुणांचा जामीन मंजूर करावा आणि त्यांना दोषमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हिंसाचारात झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. हे आंदोलन राज्यभर टप्याटप्याने होणार असून, पुण्यात सोमवारी (ता.20) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे आंदोलन दररोज चालणार आहे. या आंदोलनात हिंसाचार होऊ नये यासाठी आचारसंहिता ठरविण्यात आल्याचेही शशिकांत कुंजीर यांनी सांगितले.

Web Title: Maratha Kranti Morcha Inconvenienced Chakri movement in front of the Divisional Commissioner's office