Maratha Kranti Morcha: शिरूरच्या पश्चिम भागात कडकडीत बंद (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळला. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकल मराठा
क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळला. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकल मराठा
क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मलठण ( ता. शिरूर ) येथे ग्रामस्थांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्व समाजाचे ग्रामस्थ या बंदला पाठिंबा देण्यासाठी जमले होते. यावेळी प्रा. अनिल शिंदे, सरपंच कैलास कोळपे, सुदाम गायकवाड, मीनानाथ गिते, गणेश जामदार, प्रकाश गायकवाड, मोहसीन आत्तार, चॉंदभाई इनामदार, संदीप गायकवाड, दादा गावडे, मुकुंद नरवडे, सखाराम मावळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सर्व समाजातील नागरिक आज या बंद मध्ये सामील झाले आहेत. त्यातून या सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतो. भविष्यात ही हुकूमशाही नष्ट करण्यासाठी तळागाळातील सर्व समाजाने एकत्रित राहण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास थोरात यांनी केले. पोपट साळवे यांनी आभार मानले.

कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथे गाव बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. शांततेत झालेल्या या सभेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे, जांबूत, पिंपरखेड, वडनेर, काठापूर या परिसरात देखील गाव बंद ठेवून महाराष्ट्र बंद ला पाठिंबा देण्यात आला होता. या काळात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बॅक, पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळांना सुट्टी दिली असल्याने गावागावात शुकशुकाट पहावयास मिळाला.

Web Title: Maratha Kranti Morcha: maharashtra band and shirur taluka