Maratha Kranti Morcha 'बंद'मधील चौघा संशयितांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - महाराष्ट्र "बंद' दरम्यान नऊ ऑगस्टला शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर, 18 संशयितांची जामिनावर मुक्तता झाली आहे. "बंद' दरम्यान एरवंडणे परिसरातील एका खासगी कंपनीचे प्रवेशद्वार तोडल्याने डेक्कन पोलिस ठाण्यात नऊ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 14 ऑगस्टला विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयाने 18 संशयितांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. संबंधित दाखल आंदोलकांच्या जामीन अर्जावर 14 ऑगस्टला रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. पुणे बार असोसिएशनच्या वकिलांनी या आंदोलकांना जामीन मिळवून देण्यासाठी मोफत कामकाज केले. ऍड. सुभाष पवार, ऍड. विवेक भरगुडे, ऍड. समीर घाटगे, ऍड. नितीन झंझाड, ऍड. भारती जागडे आदी वकिलांनी युक्तिवाद केला.
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation crime court