Maratha Kranti Morcha: डबा द्यायला गेला अन्‌ पकडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पौडरस्ता - माझी खाणावळ असल्याने माझा मुलगा मित्रासोबत डबे पोचवण्यासाठी कोथरूड डेपो परिसरात गेला होता; मात्र पोलिसांनी त्याला आंदोलक म्हणून पकडले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तो निर्दोष असून त्याचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाल्यास पोलिस जबाबदार असतील, असा आरोप अलका जगताप यांनी केला. 

सकल मराठा मोर्चातर्फे गुरुवारी (ता. ९) कोथरूड भागात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्यामध्ये झालेल्या, दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमधील संशयितांची पोलिसांनी धरपकड केली. ज्यांचा या घटनेशी वा आंदोलनाशी संबंध नव्हता अशा लोकांना यात गोवल्याचा आरोप होत आहे. ज्यांनी गोंधळ घातला, चौकाचौकात पोलिसांना त्रास दिला, त्यांना ताब्यात घेण्याऐवजी पोटासाठी धडपडणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे यशवंतराजे प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश उभे व सामाजिक कार्यकर्ते सुहास उभे यांनी सांगितले.

मी मुठेश्वर कॉलनी येथे (खाणावळ) चालवते. माझा मुलगा रोहन व त्याचा मित्र रोहित पोकळे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. आम्ही आमची कामे नाही केली तर पोट कसे भरणार. पोलिसांनी गुन्हेगारांना अवश्‍य पकडावे; पण निरपराध्यांना सजा का? खोट्या आरोपामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे याचा विचार पोलिसांनी करावा.
- अलका जगताप, रोहनची आई 

Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Rohan Jagtap Crime