मंत्रालयातील बाबूंमुळेच 'सारथी'च्या स्वायत्ततेवर घाला: मराठा मोर्चा

Maratha Kranti Morcha Put allegations that officers in the ministry underestimate the work of Sarathi
Maratha Kranti Morcha Put allegations that officers in the ministry underestimate the work of Sarathi

पुणे : मराठा समाजाचा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक निर्देशांक उंचावण्यासाठी छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) कामकाज नऊ महिन्यांपूर्वी सुरू झाले. पण मंत्रालयातील 'बाबू लोक जाणीवपूर्वक 'सारथी'च्या कामावर प्रतिबंध आणले आहेत. हे निर्बंध त्वरीत उठवावेत अन्यथा याविरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरले, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.



उपसचिव रविंद्र गुरव यांनी ३ डिसेंबर रोजी सारथी उपक्रमातील योजना निहाय निधी अटी व शर्थी निश्चित करून देण्याचा अधिकार शासनाला देण्यात आले, यामुळे सारथीच्या स्वायत्ततेवर घाला घातला आहे. या विरोधात पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाने भूमिका स्पष्ट केली. 

पुण्यात स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजपविरोधात नवी आघाडी

अनुसूचित जातीसाठी 'बार्टी,अनूसुचित जमातीसाठी 'टीआरटीआय' आणि मराठा समाजासाठी 'सारथी" या स्वायत्त संस्था आहेत. पण शासनातील काही अधिकारी जाणीवपूर्वक 'सारथी'ला अडचणी आणत आहेत. ९ महिन्यांपासून 'सारथी'चे काम सुरू झाले, पण गेल्या तीन वर्षांपासूनचा अाॅडीट रिपोर्ट मागत आहेत. हे या संस्थेवर घाला घालायचा प्रयत्न आहे. 

नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार

प्रधान सचिवजे पी गुप्ता हे वारंवार आडमुठ्या भूमिका घेत आहेत, तसेच इतर अधिकारी बार्टी आणि सारथीला कसे काय वेगळा न्याय कसे काय देता. अधिकार्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करून विद्यार्थ्यांचेे स्टायफंड, शिष्यवृत्ती व इतर उपक्रम यावरील निर्बंध उठवावेत. अन्यथा याविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत केली. तुषार काकडे, हनुमंत मोटे, सचिन आडेकर, गणेश मापारी, व्यंकटेश बोडखे यावेळी उपस्थित होते. 

शस्त्रासह पोलिस अधिक्षकांचा फोटो व्हायरल; कारवाई होणार?

हजारो तरुणांचे नुकसान 
''सारथीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी पीएचडी, एमपीएससी, युपीएससीची तयारी करत आहेत. पण सारथीच्या उपक्रमांवर अचानक प्रतिबंध आणल्याने या तरुणांचे भविष्य टांगणीला लागले आहे, असे कोंढरे यांनी सांगितले.

 पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com