Maratha Kranti Morcha ...अन सुप्रिया सुळे रस्त्यावर मांडी घालून बसल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बारामती शहर - मराठा आरक्षणासह इतरही मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील वागण्याची गरज आहे. सर्व महत्त्वाच्या या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

मराठा आरक्षणासह इतरही मागण्यांसाठी मळद (ता. बारामती) येथील अमोल भापकर हा युवक बुधवारी पहाटेपासूनच भिगवण रस्त्यावरील महावितरणच्या टॉवरवर चढून बसला होता. सकाळी सव्वानऊच्या सुमारास सुळे घटनास्थळी आल्या. त्यांनी विनंती केल्यानंतर अमोल खाली उतरला व प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. 

या नंतर पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री व इतर मंत्री असंवेदनशील बोलतात, ही गोष्ट युवकांच्या मनाला लागते. त्यामुळे सर्वच जबाबदार मंत्री व इतरांनीही कोणत्याही समाजाबद्दल चुकीचे विधान करू नये. त्यामुळे सर्वांनीच शांततेने राहावे.’’ 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अमोल भापकर स्वातंत्र्यदिनी भल्या पहाटेच महावितरणच्या टॉवरवर चढून बसला होता. या घटनेने पोलिसांसह प्रशासनाची झोप उडाली होती. सर्व मित्र व प्रमुखांनी विनंती करूनही अमोलचे मन वळविण्यात ते अयशस्वी ठरत होते. शेवटी खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती केल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि अमोलला विनंती केली. सुळे यांची विनंती मान्य करून शेवटी अमोल खाली उतरला व सुळे यांच्या आश्वासनानंतर तीन तास सुरू असलेले हे नाट्य संपुष्टात आले.

...अन सुप्रिया सुळे रस्त्यावर बसल्या
अमोल भापकर याच्याशी चर्चा करण्याचे ठरल्यावर सुप्रिया सुळे टॉवर शेजारी असलेल्या रस्त्यावरच मांडी घालून खाली बसल्या. अमोल टॉवरवरून खाली उतरेपर्यंत त्या खाली बसून होत्या.

मुख्यमंत्र्यांनी साप सोडण्याचे विधान करून तसेच नोकऱ्या कुठे आहेत, असे विधान करून नितीन गडकरी यांनी मराठा समाजाला बदनाम केले आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे.
- अमोल भापकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Reservation Agitation Amol Bhapkar Supriya Sule