Video : विधानभवनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा; वेळप्रसंगी लॉन्ग मार्चही काढण्याची तयारी

Pune, Reservation, Maratha Kranti morcha
Pune, Reservation, Maratha Kranti morcha

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिवेशनाच्या वेळी  विधानभवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रखडलेल्या महावितरणच्या भरतीबाबत 1 आणि 2 डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्याच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर देखील निदर्शन देखील करणार असल्याचा निर्णय देखील यावेळी  घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.

 महावितरणच्या भरतीबाबत उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. भरती प्रक्रियेतील प्रवेश सुकर करावा. सुपर निम्युररीचा पर्यायाचा विचार व्हावा, असे राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी म्हटले आहे. 8 तारखेला मुंबईत धडक मोर्चा काढणार आहोत जर अधिवेशन पुढे ढकलले तर 15 ते 20  तारखेच्या दरम्यान पायी लॉंग मार्च काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

 2 तारखेला महाराष्ट्र विद्युत मंडळाची भरती आहे. या भरतीमध्ये ईसीबीसीच्या मुलांना सामावून घेण्याची भूमिका जाहीर केली. पण त्याची प्रक्रिया झालेली नाही. 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेत काही मुले बाहेर फेकेली गेली. 2014 ते 2020 पर्यंतच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली. हे गाऱ्हाण विधीमंडळाच्या कानावर घालण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत, असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com