मराठा लाइट इन्फंट्रीची ‘माऊंट कुन’वर मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे - लष्करातील मराठ्यांच्या शौर्याची फडकणारी पताका म्हणजे मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट. या रेजिमेंटच्या स्थापनेस अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याने अधिकाऱ्यांनी माऊंट कुन या शिखरावर गिर्यारोहणाची मोहीम आयोजित केली आहे. त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीस जण सहभागी होणार आहेत. या मोहिमेला लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयात आज झेंडा दाखविण्यात आला. मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, मनोज पांडे, ब्रिगेडियर गोविंद कालवाड, लेफ्टनंट कर्नल योगेश धुमाळ उपस्थित होते. माऊंट कुन हे शिखर कारगिलजवळ असून, या मोहिमेदरम्यान जवान त्याची सात हजार ७७ मीटर म्हणजेच २३ हजार २१८ फूट उंची सर करतील.

पुणे - लष्करातील मराठ्यांच्या शौर्याची फडकणारी पताका म्हणजे मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट. या रेजिमेंटच्या स्थापनेस अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याने अधिकाऱ्यांनी माऊंट कुन या शिखरावर गिर्यारोहणाची मोहीम आयोजित केली आहे. त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीस जण सहभागी होणार आहेत. या मोहिमेला लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयात आज झेंडा दाखविण्यात आला. मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, मनोज पांडे, ब्रिगेडियर गोविंद कालवाड, लेफ्टनंट कर्नल योगेश धुमाळ उपस्थित होते. माऊंट कुन हे शिखर कारगिलजवळ असून, या मोहिमेदरम्यान जवान त्याची सात हजार ७७ मीटर म्हणजेच २३ हजार २१८ फूट उंची सर करतील. त्यापूर्वी ते सोनमर्गजवळ गिर्यारोहणाचा सराव करतील. त्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेस सुरवात होईल, असे दक्षिण मुख्यालयाने कळविले आहे.

Web Title: maratha light infantry mount kun mountaineering campaign