घरगुती गणेशोत्सवावरही मराठा मोर्चाचा फिवर

गणेश बोरुडे
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

तळेगाव स्टेशन (पुणे) : नुकत्याच शमलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा फिवर राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सवांसह घरगुती गणेशत्सवावरही चढल्याचे दिसून येत आहे.तळेगाव दाभाडे येथील रवी साबळे यांनी आपल्या घरात मराठा क्रांती चौकाची प्रतिकृती उभारुन त्यावर श्री गणेशाची स्थापना केली आहे.

तळेगाव स्टेशन (पुणे) : नुकत्याच शमलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा फिवर राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सवांसह घरगुती गणेशत्सवावरही चढल्याचे दिसून येत आहे.तळेगाव दाभाडे येथील रवी साबळे यांनी आपल्या घरात मराठा क्रांती चौकाची प्रतिकृती उभारुन त्यावर श्री गणेशाची स्थापना केली आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर निघालेले मराठा क्रांती मोर्चाचा फिवर राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सवांसह घरगुती गणेशत्सवावरही चढल्याचे दिसून येत आहे.कर्जबाजारी शेतकरी आत्महत्यांवर आधारित देखावे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक मंडळांकडून सादर केले जात आहेत.राज्यभरात आजपावेतो "मूक मोर्चा" म्हणून आदर्श ख्याती पावलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने यावर्षी उग्र रुप धारण केले. मराठा आरक्षण आंदोलनात अनेकांनी जीवदान दिल्याने आंदोलन शमल्यानंतर अवघ्या महिनाभरात सुरु झालेल्या गणेशोत्सवावर साहजिकच मराठा मोर्चाचा ठसा उमटलेला दिसतोय. अगदी घरगुती गणपती देखील याला अपवाद नाही.पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे गेल्या 9 ऑगस्टला झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून देशातील पहिल्या मराठा क्रांती चौकाचे अनावरण 15 ऑगस्टला करण्यात आले.त्याच पार्श्वभूमीवर तळेगाव स्टेशनच्या इंद्रायणी कॉलनीत राहणाऱ्या रवी साबळे यांनी आपल्या घरातला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी याच मराठा क्रांती मोर्चाची हुबेहूब प्रतिकृतीरुपी मंच आपल्या घरात बनवून त्यावर श्रींची प्रतिष्ठापना केली आहे.

साबळे यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावर विराजमान गणपती पाहण्यासाठी परिसरातील सकल मराठा समजासह गणेशभक्त भेट देत आहेत. राज्यभरात चौकाचौकात पेटलेल्या मराठा क्रांती आंदोलनाने आपल्या मागण्या मान्य करण्याहेतूने सरकारला जाग आणण्याचा चंग बांधला आहे.आता याच मंचावर स्थापिलेल्या गणेशाच्या आशीर्वादाने आरक्षणाची मागणी नक्कीच सफल होईल अशी आशा साबळे यांना आहे.

"सर्व समाज मराठा क्रांती मोर्चाच्या रुपाने तळेगावात एकत्र आलेला पहायला मिळाला.तो कायम तसाच रहावा.त्याहेतूने गणेशाला साकडे घालण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावर श्रीची प्रतिष्ठापना केली आहे."
- रवी साबळे

Web Title: maratha morcha fever on ganesh festival also