मराठा आरक्षणावरून अर्ज भरताना समस्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले असले तरी, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राज्य लोकसेवा पूर्वपरीक्षेचे अर्ज भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अर्ज भरताना मराठा हा गट दिसत असला तरी, आर्थिक-सामाजिक मागास ही श्रेणी दिसत नसल्याची तक्रार या समाजातील तरुणांनी केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची ही पूर्वपरीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. परीक्षेसाठी जातप्रमाणपत्र सक्तीचे आहे. त्यामुळे पुढील अठरा दिवसांत हे प्रमाणपत्र मिळणार का, अशी चिंता तरुणांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Maratha Reservation Form Issue