‘मराठा आरक्षणाबाबत सरकारची नियत साफ’ - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आश्‍वासन दिले होते. सरकारने ते आश्‍वासन पाळले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची नियत साफ आहे, असे मत अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्‍त केले. 

पुण्यात गुरुवारी एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका पूर्वीपासून सकारात्मक आहे. परंतु, आरक्षणाला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे होते. आरक्षण हे मतांसाठी किंवा निवडणुकीसाठी देता कामा नये. शेवटच्या घटकाची उन्नती करणे, ही सरकारची जबाबदारी आहे.

Web Title: Maratha Reservation Government