आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर; 4 फेब्रुवारीला पुण्यातून निघणार संघर्ष यात्रा

Maratha reservation Sangharsh Yatra will start from Pune on February 4
Maratha reservation Sangharsh Yatra will start from Pune on February 4

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून, न्यायालयामध्ये आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. येत्या पाच फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून, आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगावदरम्यान मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संघर्ष यात्रा चार फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघणार असून, पाच फेब्रुवारी रोजी जालना येथे पोचेल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली. 

या पत्रकार परिषदेस मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याचे समन्वयक राजेंद्र कोढंरे, रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, नाना निवंगुने, हनुमंत मोटे, अनिल ताडगे, धनंजय जाधव, मीना जाधव, प्राची दुधाने, दीपाली पाडाळे, किशोर मोरे, बाळकृष्ण वांजळे, जिवन बोराडे, अमर पवार आदी उपस्थित होते. 

Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा  

चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथन यात्रेला सुरवात होईल. शिवाजीनगरमार्गे, येरवडा, नगर रस्ता, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, सुपा, नगर, अमळनेरमार्गे बीड येथे मुक्काम करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता बीड येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होइल. बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. 

मराठा आरक्षणासाठी २३ मार्च १९८२ रोजी स्व.आण्णासाहेब पाटील यांनी पहिले आत्मबलिदान दिले. तेव्हापासुन सुरु असलेला हा लढा तीन-चार वर्षांत तीव्र झाला. लढवय्या मराठ्यांनी संयम न सोडता शांततेत ५८ मोर्चे काढले. शांततापूर्व लढ्यात ४२ मराठा तरुण आरक्षणासाठी शहीद झाले. तसेच १४ हजार ५२३ मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले. परंतु त्याला न्यायालयात स्थगिती मिळाल्यामुळे मराठा तरुणांच्या नोकरीच्या नियुक्त्या प्रलंबित असून, मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत. साष्ठ पिंपळगावातील मराठ्यांनी ठिया आंदोलनातून संघर्ष सुरु केला आहे. त्यांना पाठिंबा देवून या लढ्याला बळकटी देण्यासाठी मराठा समाजाने संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com