मराठा समाजाच्या प्रगतीत संपत चाललेल्या संवादाचा अडथळा : पुरुषोत्तम खेडेकर

junnar
junnar

जुन्नर - परस्परांतील संपत चाललेला संवाद मराठा समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरत असल्याचे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केले 

येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयात शुक्रवारी ता.6 रोजी सांयकाळी झालेल्या मराठा समाज बांधवाच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

मराठा जनसंवाद मार्गदर्शक दौऱ्याच्या निमित्ताने जुन्नर परिसरातील मराठा समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. राज्य कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, रमेश गुजर, अँड सुनील बांगर,तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, सकल मराठा समाजाचे दत्ता म्हसकर, डॉ. के. डी. पुराणे, डॉ आर. डी. कासार, संभाजी तांबोळी, दीपक कोकणे, नरेंद्र तांबोळी, भास्कर पानसरे, अँड लाला निकम, ज्ञानेश घोलप आदी मान्यवर व समाजबांधव यावेळी उपस्थित होते. 

खेडेकर म्हणाले,मराठा समाज माझे कुटुंब आहे या तत्वाचा अंगीकार प्रत्येकाने करावा.महिलांना सन्मानाचे स्थान दिले तर समाज सुधारणा होण्यास मोठी मदत होणार असल्याने यापुढील काळात महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करा. तरुण व्यसनांपासून दूर राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. त्यांना विधायक कार्यात सहभागी करून घ्या. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा. कल्याणपेठ तरुण मंडळाचे वतीने विनायक गोसावी यांनी स्वागत केले. प्रास्तविक सुनील ढोबळे यांनी केले.मिनानाथ पानसरे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com