मराठा संवाद यात्रा उद्या विधानभवनावर - कुंजीर

Maratha-Kranti-Morcha
Maratha-Kranti-Morcha

पुणे - मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत विधानभवनावर सोमवारी (ता. २६) ‘मराठा संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची प्रक्रिया करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी ही संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. विधिमंडळातील बैठकीत मराठा आरक्षणाशिवाय इतर दुसरा कोणताही विषय घेऊन विरोधकांनी आरक्षणाचा विषय बंद करण्याचा प्रयत्न करू नये, सरकार मराठा - ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com