मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत - तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

पुणे - ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत देण्याची योजनादेखील तयार केली जात आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतःच करतील,‘‘ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

शिक्षण विभागाच्या एका कार्यक्रमासाठी तावडे सोमाटणेजवळील शिरगाव येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मराठा क्रांती मूक मोर्चामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या समाजाला तातडीने आरक्षण मिळण्याची मागणी त्याद्वारे केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यांच्या भूमिकेला तावडे यांनीदेखील पुष्टी दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीबाबत मात्र त्यांनी सविस्तर माहिती देण्याचे टाळले. 

तावडे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनीच लक्ष घातले आहे. समाजातील सर्व घटकांशी संवाद सुरू आहे. योग्यवेळी ते निर्णय जाहीर करतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत देण्याची योजना तयार केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर योजनेची घोषणा ते करतील.‘‘ 

Web Title: Maratha students education discounts