#MarathaKrantiMorcha मराठा मोर्चाच्या 20 आंदोलकांना अटक 

संदीप घिसे
सोमवार, 23 जुलै 2018

पिंपरी (पुणे) - मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी मराठा सेवा संघ आणि क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवड येथे घोषणाबाजी करीत आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वाकड पोलिस ठाण्यात नेले. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवडमधील होणारी सभा उधळून लावणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सतर्क झालेले पोलिस आंदोलनकर्त्यांवर नजर ठेवून होते. तसेच मुख्यमंत्री येण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला. सकाळी दहा वाजता आंदोलनकर्त्यांनी चिंचवड स्टेशन येथून घोषणाबाजी करीत लोकमान्य रुग्णालयापर्यंत आले. मात्र तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

आंदोलनकर्त्यांमध्ये मराठा सेवा संघाचे सतीश काळे, नकुल भोईर, सुधीर उंडे, रसीद सय्यद, मारुती भापकर, ज्ञानेश्वर लोघे, विनायक जगताप, प्रवीण बोऱ्हाडे, गणेश कोकाटे, वैभव जाधव, अभिषेक मते, अक्षय बुंदील, प्रकाश जाधव, भय्यासाहेब गगणे, लहू लांडगे, प्रकाश जाधव, अमोल मानकर, किरण जगदाळे, जीवन बोऱ्हाडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून वाकड येथे स्थानबद्ध केले आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha 20 protesters of the Maratha Morcha are arrested