#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी 9 आॅगस्टला मार्केटयार्ड बंद

महेंद्र बडदे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे :  मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी 9 आॅगस्टला मार्केट यार्ड येथील बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची तातडीची  सभा आज (सोमवारी) झाली. या सभेमध्ये सध्या चालू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्यव्यापी आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर सभेमध्ये उपस्थित सर्व सभासदांनकडून सध्या चालू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्य़ासाठी असोसिएशनचे कार्यकारणी मंडळ  व छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन व महाराष्ट्र राज्य जनरल कामगार युनियन यांनी एकमताने पाठिंबा देणेचे जाहीर केले. त्यानुसार (ता. 9)आॅगस्टला गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी व पान बाजार या सर्व विभागात लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. सदर सभेस आडते असोसिएशनचे अध्यक्ष-विलास दत्तात्रय भुजबळ व सर्व कार्यकारी मंडळी तसेच आडते असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

Web Title: #MarathaKrantiMorcha 9 August MarketYard closed or support of maratha morcha