आमदार सोनवणेच्या घरासमोर धरणे, जागरण गोंधळ 

दत्ता म्हसकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात आवाज उठवावा यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे समन्वयक रमेश हांडे यांनी सांगितले.

जुन्नर : चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे आज (ता. ५) दिवसभर जुन्नर तालुक्यातील सकल  मराठा समाजाच्या वतीने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या घरासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी धरणे तसेच जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात आवाज उठवावा यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे समन्वयक रमेश हांडे यांनी सांगितले.

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जुन्नर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सोनवणे यांच्या रायगड निवासस्थानासमोर भजन व जागरण करून धरणे आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: MarathaKrantiMorcha agitation on front of MLA Sharad Sonawane home