#MarathaKrantiMorcha आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

नितीन बिबवे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बिबवेवाडी (पुणे) : सकल मराठा क्रांती मोर्चाने पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाल यांच्या बिबवेवाडीतील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले, यावेली राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची व राज्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलना दरम्यान आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

मिसाल यांच्या कार्यालयसमोर सकल मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, आंदोलनात आमदार मिसाल सहभागी होत आंदोलनाबाबत राज्यसरकारची भूमिका मांडली, आंदोलकांनी आमदार मिसाल यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: #MarathaKrantiMorcha Ghantanad agitation infront of the office of MLA Madhuri Misal