हडपसर-मांजरी परिसरात उत्स्फूर्तपणे बंद

MarathaKrantiMorcha Maharashtra band at Hadapsar Manjari Pune
MarathaKrantiMorcha Maharashtra band at Hadapsar Manjari Pune

मांजरी : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदमधून पुणे जिल्हा वगळण्यात येऊनही हडपसर-मांजरी परिसरात अनेकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी दुकाने बंद करून बंदला प्रतिसाद दिला. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी तसेच आपल्या मागण्यांसाठी तरुणांनी परिसरातून रँली  काढली होती. त्यामुळे या भागात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

क्रांती मोर्चाच्या वतीने रविदर्शन ते हडपसर गाव असा पायी मोर्चा आयोजित केला होता. मोर्चा मधील पाच महिलांनी पोलिस उपायुक्त दिपक साकोरे, सहाय्यक आयुक्त गणेश गावडे, हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांना मागण्यांचे निवेदन दिले. जलसमाधी घेतलेला युवक काकासाहेब शिंदे यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी. मराठा आरक्षण मागणीसाठी गेली दोन वर्षे शांततामय मार्गाने आंदोलन केले व मागणी केली होती. तरीही सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी मराठा आरक्षणा संदर्भात तातडीने निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

दरम्यान, परिसरातील शाळा महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना घरी पाठवून बंद पाळला. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com