#MarathaKrantiMorcha मराठा संवाद यात्रेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बारामती शहर - गेल्या काही दिवसांत राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर समाजात सलोखा नांदावा, यासाठी रविवारपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. 

बारामती शहर - गेल्या काही दिवसांत राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर समाजात सलोखा नांदावा, यासाठी रविवारपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. 

प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून, बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे. सासवड, पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे. या यात्रेदरम्यान माहिती पत्रकाचे वाटप होणार असून, आरक्षण मोहिमेत शहीद झालेल्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. रविवारी बारामतीत शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी विशेष तयार केलेली प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिकपणे घेतली. या संवाद यात्रेचा उपक्रम समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मान्यवरांनी या प्रसंगी नमूद केले.

Web Title: #MarathaKrantiMorcha reservation agitation sanvad yatra