#MarathaKrantiMorcha बंदला हवेली तालुक्यात चांगला प्रतिसाद

जनार्दन दांडगे
सोमवार, 30 जुलै 2018

लोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने, पुढील अनर्थ टळला.

लोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने, पुढील अनर्थ टळला.

मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंद करण्याच्या आवाहनास उरुळी कांचन शहरात सकाळपासून संधिग्ध भूमिका ग्रामस्थांत होती. शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वतःहून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु, महात्मा गांधी रस्तावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले होते. मराठा संघटनांच्या  सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी महात्मा गांधी रस्तामार्ग येथे येत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. यादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

लोणी काळभोर येथे उपसरपंच योगेश काळभोर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज काळभोर, सिध्देश्वर काळभोर, अप्पा काळभोर, गोरख मोरे व त्यांच्या पन्नासहुन अघिक सहकाऱ्यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परीसरातील दुकानदारांना आपआपले व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत सदोन्ही गावाताल नागरीकांनी व व्यावसायिकांनी आपआपले व्यवहार बंद ठेऊन, मराठा संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.  

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंद च्या आंदोलनास उरुळी कांचन व लोणी काळभोरमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. हवेली तालुक्यातील मंगळवार दि.३० रोजीचा बंद आवाहनास उरुळी कांचन व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. काही खाजगी शाळा बंद ठेवल्या आहेत. तर आरोग्य सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली असून पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha response to maharashtra band in haveli taluka