जुन्नरला पाडळी गणात मराठा समाजाचे रास्ता रोको

दत्ता म्हसकर
सोमवार, 30 जुलै 2018

जुन्नर - 'मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अन्यथा पुढील काळात आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल' असा इशारा कबाडवाडी ता.जुन्नर येथील चौकात पाडळी गणातील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनच्या वेळी देण्यात आला. 

यानिमित्ताने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव कबाडवाडीच्या मुख्य चौकात जमा झाले होते. यावेळी माणिकडोह, नाणेघाट तसेच आदिवासी भागात जाणारी वाहने अडविण्यात आली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून शासनाचा निषेध केला. 

मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक देवेंद्र खिलारी, अरुण पापडे, सारंग घोलप, खामगावचे उपसरपंच राजेंद्र डुंबरे, संतोष ढोबळे, शिवाजी डोंगरे, अजिंक्य घोलप, विवेक पापडे, अविनाश ढोबळे, गणेश बुट्टे पाटील, संभाजी बुट्टे, सचिन बढे, राजेश ढोबळे, पंकज कबाडी, संजय खंडागळे यांसह युवक व महिला उपस्थित होत्या. शासनाच्या वतीने जुन्नरच्या मंडलाधिकारी शोभा भालेकर व रोहिदास सुपे यांनी निवेदन स्विकारले. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक सुरेश बोडखे, कर्मचारी अमोल चासकर व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: #MarathaKrantiMorcha response to maratha morcha in junnar