#MarathaKrantiMorcha शाळा, महाविद्यालये, मद्यविक्री उद्या बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे उद्या (ता.9) बंद राहणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची सूचना जारी केली आहे.

पुणे महानगरपालिका आयुक्तांनाही शहरी भागासाठी सूचना कढण्यास तसेच पुणे विद्यापीठ आणि इतर अभिमत विद्यापीठांच्या कुलसचिवांना कामकाज बंद ठेवण्यास सांगितले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

पुणे महापालिकेने देखील सर्व प्राथमिक, माध्यमिक महापालिका आणि खाजगी व्यवस्थापणाच्या शाळा उद्या (ता.9) बंद राहणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हातील कायदा व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी देशी विदेशी मद्य, ताडी विक्री उद्या सांयकाळी 5 वाजेपर्यंत राहतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशात नमूद केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha Schools, colleges, liquor shops closed tomorrow