चाकणमध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील तळ ठोकून

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जुलै 2018

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या जाळपोळीनंतर आज (मंगळवार) चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 400 पोलिस तैनात करण्यात आले असून, पोलिस अधिक्षक संदीप पाटील तळ ठोकून आहेत. 

चाकण (पुणे) : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या जाळपोळीनंतर आज (मंगळवार) चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 400 पोलिस तैनात करण्यात आले असून, पोलिस अधिक्षक संदीप पाटील तळ ठोकून आहेत. 

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून 25 पेक्षा अधिक वाहने संरक्षणासाठी ठेवली आहेत. सर्व महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त आहे. 20 टक्के दुकाने अजूनही बंद आहेत. परंतु, दैनंदिन व्यवहार सुरळित चालू आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. काल समाजकंटक म्हणून 5000 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणावरही थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 30) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी व खासगी बस आणि पीएमपीच्या (शहर वाहतूक सेवा) सुमारे 25 बस आणि मालवाहू ट्रक, पोलिसांची वाहने, तसेच पोलिस चौकी जाळली. पोलिसांना सायंकाळी सहा वाजता जमावावर नियंत्रण आणण्यात यश आले. राजगुरुनगरमध्येही आंदोलनादरम्‍यान जाळपोळीचे प्रकार घडले.

Web Title: MarathaKrantiMorcha SP Sandip Patil in Chakan