प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन 

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन 

पुणे - मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखिका कविता महाजन (वय 51) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बावधन येथील चेलाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्र, भिन्न, ग्राफिटी वॉल या त्यांच्या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. "कुहू' या कादंबरीच्या माध्यमातून "मल्टिमीडियाचा बुक'चा प्रयोगही केला होता. इस्मत चुगताई यांच्या "रजई' या ऊर्दू लघुकथासंग्रहाचे त्यांनी मराठी भाषांतर केले होते. त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार (2008), तसेच कवियित्री बहिणाबाई पुरस्कारही (2008) त्यांना मिळाला होता. 

"जोयानाचे रंग' या बालसाहित्यालाही शशिकलाताई आगाशे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य या विषयात त्यांनी एम.ए. पदवी संपादित केली होती. कविता आणि कादंबऱ्या हा त्यांच्या लेखनाचा मुख्य प्रांत होता. गेल्या काही वर्षांपासून त्या आदिवासी साहित्याचाही अभ्यास करत होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एका गणिकेने लिहिलेल्या कवितांच्या पुस्तकाचे संपादन करून प्रकाशित केले होते.

*********************************
कविता महाजन

कविता महाजन (सप्टेंबर ५, इ.स. १९६७; नांदेड, महाराष्ट्र - हयात) या मराठी लेखिका, कवयित्री होत्या.

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या.

प्रकाशित साहित्य
अंबई : तुटलेले पंख    
आग अजून बाकी आहे    
आगीशी खेळताना        
आबा गोविंदा महाजन : बालसाहित्य आकलन आणि समीक्षा    
कुमारी माता    अनुवादित पुस्तक    
कुहू     
कुहू (लहान मुलांसाठी)    लेखसंग्रह    
ग्राफिटीवॉल    
बकरीचं पिल्लू : जंगल गोष्टी, पाच पुस्तकांचा संग्रह    बालसाहित्य        
जोयानाचे रंग    बालसाहित्य    
ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम    
तत्पुरुष    काव्यसंग्रह        
तुटलेले पंख (संपादित: भारतीय लेखिका पुस्तक मालिका)    लेखसंग्रह        
धुळीचा आवाज    काव्यसंग्रह        
पूल नसलेली नदी (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका)    कथा संग्रह        
म्रृगजळीचा मासा    काव्यसंग्रह        
ब्र    कादंबरी    
भिन्न    कादंबरी    
रजई (इस्मत चुगताई)    लघुकथासंग्रह        
वारली लोकगीते    आदिवासी लोकगीतांचे संकलन व संपादन    साहित्य अकादमी    
वैदेही यांच्या निवडक कथा (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका)    कथा संग्रह
(जानकी श्रीनिवास मूर्ती यांच्या कथांचा अनुवाद. अनुवादक : उमा कुलकर्णी)        
समतोल खा सडपातळ रहा    पाकशास्त्
समुद्रच आहे एक विशाल जाळं    कवितासंग्रह

पुरस्कार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (इ.स. २००८)
कवयित्री बहिणाई पुरस्कार (इ.स. २००८)
साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला)(इ.स. २०११)
मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com