मराठी मुलांनी उद्योजक व्हावे - डॉ. प्र. चिं. शेजवलकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘मी माझ्या प्रदीर्घ प्राध्यापकीच्या काळाकडे पाहिले, तर असे जाणवते की मराठी मुले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागतात. याउलट इतर समाजातील मुलांना उद्योगांमध्ये रस असतो. स्वतःचा उद्योग स्थापन करून तो वाढवावा, असे मराठी मुलांना वाटत नाही,’’ अशी खंत व्यवस्थापन क्षेत्राचे तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात शेजवलकर यांनी आपला जीवन प्रवास उलगडत अनेक गमतीदार किश्‍श्‍यांना उजाळा दिला. व्यवस्थापन क्षेत्र, मराठी मुलांची मानसिकता, त्यांना लाभलेला दिग्गजांचा सहवास आणि प्रपंच सांभाळत केलेली प्राध्यापकी या सर्वच पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. संजय गोखले यांनी शेजवलकर यांच्याशी संवाद साधला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह उद्धव कानडे आदी या वेळी उपस्थित होते.

‘‘मराठी मुले अजूनही नोकरीच्या मागे का पळतात, हा प्रश्न आहे. इतर समाजातील मुलांना उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्यांत रस नसतो. मराठी माणसांनी ही मानसिकता आता बदलायला हवी. उद्योजक समाजाची प्रगती घडवत असतात. त्यात मराठी मुलांचा वाटाही असला पाहिजे, ही इच्छा अनेक वर्षांपासून आहे,’’ असे शेजवलकर यांनी सांगितले.

पंतप्रधान पदासाठी पवार पात्रच
‘‘मला अनेक दिग्गज नेते आणि समाजसुधारकांचा सहवास लाभला. शरद पवार यांना मी बीएमसीसी महाविद्यालयात शिकवायला होतो. त्या काळीच ही व्यक्ती पुढे जाऊन देशाचा नेता होईल, असे त्यांच्याकडे असलेल्या गुणांवरून वाटायचे. त्यांच्याकडे असलेल्या गुणांमुळे ते पंतप्रधान पदासाठी लायकच आहेत,’’ असे सांगत शेजवलकर यांनी पवार यांचा गुणगौरव केला.

Web Title: Marathi Child Businessman